उस्मानाबाद : गुरुवारी पोलिसांनी दिवसभरात जिल्ह्यातील सर्वच ठाण्यांनी ५१ दारू अड्ड्यांवर छापे टाकले़ मद्यविक्री व निर्मिती करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करतानाच सुमारे पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
जिल्ह्यात अवैध दारु विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी दिले होते़ या अनुषंगाने गुरुवारी दिवसभरात उस्मानाबाद शहर, ढोकी, येरमाळा, उमरगा, भूम, मुरुम, बेंबळी, कळंब, उस्मानाबाद ग्रामीण, आनंदनगर, तुळजापूर, नळदुर्ग, शिराढोण, परंडा, लोहारा, आंबी, तामलवाडी या पोलीस ठाण्याच्या वतीने ५१ ठिकाणी छापे टाण्यात आले़
या छाप्यात आढळलेला गावठी दारु निर्मितीचा ६ हजार ४३० लिटर द्रवपदार्थ ओतून नष्ट करण्यात आला़ ५१५ लिटर गावठी दारु, २२१ देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या़ ओतून दिलेला मद्यार्क व जप्त केलेल्या दारुची एकत्रित किंमत ३ लाख ८६ हजार ६८८ आहे़ यावरुन संबंधित पोलीस ठाण्यात ५१ गुन्हे नोदविण्यात आले आहेत़