उस्मानाबाद : दरवर्षी दहावीच्या निकालानंतर पाॅलिटेक्निकच्या अर्ज प्रक्रियेस सुरुवात केली जाते. या वर्षी विद्यार्थ्यांना कागदपत्रे गोळा करण्यासाठी वेळ मिळाला याकरिता ३० जूनपासूनच अर्ज प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. मागील २१ दिवसांत ८२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याची माहिती प्राचार्याने दिली.
यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे मुलांचे वर्षभराचे मूल्यमापन करून निकाल लावण्यात आले. विद्यार्थ्यांना कागदपत्रे गोळा करण्यासाठी वेळ मिळाला याकरिता, पाॅलिटेक्निक प्रवेशासाठी ३० जूनपासून अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. सुरुवातीचे काही दिवस नोंदणीसाठी विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद कमी होता. दहावीच्या निकालानंतर नोंदणीसाठी गती वाढली आहे. मात्र, कागदपत्रांअभावी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत. पूर्वी पाॅलिटेक्निकसाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जायचे याचे प्रमाण काही वर्षांपासून कमी झाल्याचे दिसून येत असल्याने दरवर्षी काही ना काही प्रमाणात क्षमतेएवढे विद्यार्थी दिसून येत नाहीत. गतवर्षी १० टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या.
निकाल लागला, आता येणार गती
दहावीचा निकाल लागल्यानंतर पाॅलिटेक्निकचे अर्ज भरण्यासाठी दरवर्षी गती येते. यंदा दहावीच्या निकालाअगोदरच पाॅलिटेक्निक अर्ज भरण्यास सुरुवात केली होती. त्यास प्रतिसाद कमी होता. १६ जुलै रोजी निकाल लागल्यानंतर अर्ज भरण्यासाठी गती आली आहे. कागदपत्रांअभावी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत.
गेल्या वर्षी १० टक्के जागा रिक्त
उस्मानाबाद येथील पाॅलिटेक्निक काॅलेजमध्ये एकूण विद्यार्थी क्षमता ३७
० असून गतवर्षी यामधील १० टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या.
विद्यार्थ्यांकडे नॅशनलिटी जात प्रमाणपत्र नाही.
दहावीचा निकाल लागल्यानंतर शाळेकडून विद्यार्थ्यांना टीसी देण्यात येते. मात्र निकालच १६ जुलै रोजी लागल्याने अनेकांना टीसी मिळाली नाही. अर्ज कन्फर्म करण्यासाठी नॅशनॅलिटी बंधनकारक करण्यता आली आहे. मात्र, अनेकांकडे नॅशनॅलिटी नाही. नॅशनॅलिटी नसल्यास पासपोर्ट, निर्गम उतारा ग्राह्य धरला जातो.
अर्ज भरण्याकरिता जातीचे प्रमाणपत्र नाही तसेच काही जणांकडे नाॅनक्रिमिलेयर प्रमाणपत्र नसल्याने ते काढण्यासाठी लगबग सुरू आहे.
कोट...
३० जूनपासून पॉलिटेक्निक प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. २१ जूनपर्यंत ३८५ जणांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८२ जणांचे अर्ज कन्फर्म झाले आहेत. कागदपत्रांअभावी अर्ज दाखल करण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाशी संपर्क साधला आहे.
डॉ. डी. एम. घायटिळक, प्राचार्य पॉलिटेक्निक कॉलेज उस्मानाबाद