येडशी : येथील रहिवासी डाॅ. राहुल हरिभाऊ कुलकर्णी यांना कोविड योध्दा पुरस्काराने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते राजभवन येथील कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. महाराष्ट मेडीकल कौन्सिलचे सदस्य डॉ. अजित गोपछडे यांनी महाराष्ट्रात कोरोना काळात उत्कृष्ट काम करणाऱ्यांसाठी या पुरस्काराचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील ५२ आरोग्य योद्ध्यांना हा पुरस्कार देण्यात आले. डॉ. राहुल कुलकर्णी यांनी कोरोना काळात २५० स्वयंसेवकांना कोरोना विषयीचे प्रशिक्षण दिले. तसेच ठाण्यातील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या २५ हजार नागरिकांची तपासणी करून तापाचे रूग्ण शोधून कोविड १९ रूग्णांचे विलगीकरण केले. कोविड रूग्णांना घरीच विलगीकरण करून विडिओ काँफेरन्सद्वारे विनामूल्य सेवाही त्यांनी दिली.
फोटो
येडशी येथील डाँ राहुल कुलकर्णी यांना राज्यपाल भगतसिगजी कोशियारी यांच्या हस्ते राज्यस्तरीय कोरोणा योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करताना आले. यावेळी डॉ. अजित गोपछडे, मुंबईच्या वैद्यकीय प्रकोष्टच्या संयोजिका डॉ. स्मिता काळे आदी.