उस्मानाबाद : शहरासह जिल्हाभर शनिवारी थोर समाज सुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. या निमित्त शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना, विविध शासकीय-निमशासकीय कार्यालयांत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
बावी आश्रम शाळा
उस्मानाबाद : तालुक्यातील बावी आश्रम शाळेत प्राचार्य बी.यू. जगताप यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. प्रास्ताविक, बी.एस. साकळे यांनी केले. प्राचार्य जगताप यांनी राजर्षी शाहू महाराजबद्दल माहिती सांगून मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेतील कर्मचारी उपस्थित होते. आभार व्ही.टी. राठोड यांनी मानले
विद्यानिकेतन आश्रम शाळा
उस्मानाबाद : तालुक्यातील शिंगोली येथील विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा व आदर्श विमुक्त जाती प्राथमिक आश्रमशाळेत शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक शिंदे, पर्यवेक्षक शेख, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.बी. पाटील, जाधव, बडदापुरे, पडवळ, शिक्षकेतर कर्मचारी मस्के, चव्हाण, बनसोडे आदी उपस्थित होते.
भोसले हायस्कूल
उस्मानाबाद : येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये प्राचार्य साहेबराव देशमुख यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये समतेचे राज्य निर्माण करणाऱ्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांनी घ्यावा, असे आवाहन केले, तसेच शाहू महाराजांचे शिक्षणविषयक व क्रीडा विषयक कार्य पुढच्या अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहील, असेही ते म्हणाले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक सिद्धेश्वर कोळी, कार्यालय अधीक्षक बालाजी घोलप, पर्यवेक्षक के.डी. हजारे, टी.पी. शेटे, डी.ए. देशमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
जयप्रकाश विद्यालय
रुईभर : तालुक्यातील रुईभर येथील जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष कोळगे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार व श्रीफल करण्यात आले. याप्रसंगी माजी जि.प. सदस्य रामदास कोळगे, तालुका शिवसेना उपप्रमुख राजनारायण कोळगे, सरपंच दत्तात्रय कस्पटे, उपसरपंच बालाजी कोळगे, प्रा.जयप्रकाश कोळगे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शिवकन्या साळुंके, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक के.ए. डोंगरे, श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार गणपती शेटे यांनी मानले.
मराठी कन्या प्राथमिक शाळा
उस्मानाबाद : येथील मराठी कन्या प्राथमिक शाळेत पिसाळ यांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार, श्रीफळ, फूल वाहून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साळुंके व आभार प्रदर्शन एस.डी. पाचकुडवे यांनी केले.
तेरणा महाविद्यालय उस्मानाबाद : येथील तेरणा महाविद्यालयात प्राचार्य डॉ.अशोक घोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास डॉ.रशीद सय्यद, डॉ.चंद्रजीत जाधव, डॉ.सुशीलकुमार सरवदे, डॉ.जी.जी. हिडगे, प्रा.छाया शिंदे, बी.बी. पाटील, राजकुमार जगदाळे, भास्कर जाधव, हनुमंत मोरे, दहिवाड, तसेच प्राध्यापक, प्राध्यापिका, कर्मचारी उपस्थित होते.
भीमनिर्णायक युवा ग्रुप
उस्मानाबाद : येथील भीमनिर्णायक युवाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात रिपब्लिकन सेनेचे गौतम बनसोडे, सम्यक विद्यार्थी संघटनेचे विकास गंगावणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भीमनिर्णायक युवाचे सचिन दिलपाक, विष्णू कांबळे, सूरज सुरते, किरण धाकतोडे, महेश बीडबाग, महादेव जोगदंड, आनंद गाडे आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कार्यालय
उस्मानाबाद : येथील जिल्हाधिकारी कार्यलायात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासनचे नायब तहसीलदार संतोष पाटील, अव्वल कारकून नरसिंह ढवळे, श्यामल वाघमारे, महसूल सहायक चंदनशिवे, गोविंद शेटे, शाकीर शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.