दरवर्षी सप्टेंबर हा महिना पोषण अभियान म्हणून राबिवण्यात येतो. यामध्ये माता आणि बालके सुदृढ रहावी, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध उपक्रम राबिवले जातात. या उपक्रमांतर्गत माता व बालकांना सशक्त करण्यासाठी हे अभियान राबविले जाते. या अभियानांतर्गत जनजागृतीसाठी प्रभातफेरी, दिंडी, विविध स्पर्धा, पोषण मेळावे आदी उपक्रम राबविण्यात येतात. या अभियानादरम्यान प्रामुख्याने पोषण आहार व त्याचे महत्त्व, स्तनपान, ॲनिर्मिया आजार, वैयक्तिक आजार, स्वच्छता, गृहभेटीद्वारे पोषण आहार, माता व बालकांना पोषक आहार व चांगल्या आरोग्य सेवा मिळण्यासाठी तसेच कुपोषण दूर होण्यास हे अभियान महत्त्वपूर्ण ठरते.
याचाच एक भाग म्हणून घारगाव येथे अंगणवाडीतर्फे गावात रॅली काढून प्रबोधन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका शरिफा शेख, ऊर्मिला कुंभकर्ण, मदतनीस सावित्रा गवळी, मंगल साळुंके, आशा कार्यकर्ती कुसूम अंकुशे, सारिका कठारे व गावातील महिला व बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते.