बलसूर : उमरगा येथील शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये शिक्षक-पालक मेळावा व विविध मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य एस. के. मलंग तर प्रमुख पाहुणे म्हणून वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एस. मलंग, संजय बदोले, बालाजी इंगळे, मुख्याध्यापक अजित गोबारे, कविराज रेड्डी, ज्येष्ठ सदस्य आप्पासाहेब हत्ते आदी उपस्थित होते.
यावेळी संजय बदोले यांची महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व कवी बालाजी इंगळे यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केल्याबद्दल डॉ. एस. के. मलंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सहशालेय उपक्रमांमध्ये पारितोषिक पटकाविलेल्या व दहावी प्रथम सराव परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले.