आमदार पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
उस्मानाबाद : केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या आत्मनिर्भर भारत या महत्त्वपूर्ण योजनेचा फायदा जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजयुमोच्या वतीने सूरज शेरकर सहकाऱ्यांनी येथे सुरू केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्रा’चा शुभारंभ आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्याच दिवशी येथे ९० लाभार्थ्यांनी नोंदणी केली.
याप्रसंगी शिबिराचे जिल्हा संयोजक भारत लोंढे यांनी कोरोना महामारीमुळे संकटात सापडलेल्या छोट्या व्यावसायिकांना उभारी देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचे सांगितले. यात किरकोळ भाजीविक्रेते, फळविक्रेते, फेरीवाले, छोटे-मोठे व्यापरी यांना बँकेमार्फत सुरुवातीला १० हजार रुपये (भांडवल) मदत दिली. जाते. पहिल्या कर्जाची परतफेड वेळेवर केल्यानंतर पुन्हा २० हजार रुपये नवीन कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शहर व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, भाजमुयो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, प्रवीण सिरसाठे, सूरज शेरकर, नागेश जगदाळे, सलमान शेख, गणेश येडके, गणेश इंगळगी, प्रसाद मुंडे, प्रसाद राजमाने, किशोर पवार, मंगेश आयाचित, राज नवले, धनंजय जाधव, बालाजी इंगळे आदी उपस्थित होते.