रविवारपासून सावरगावच्या नागोबा यात्रेस प्रारंभ झाला. दुपारी साप, पाल, विंचवाचे आगमन मंदिरासमोर असलेल्या दगडी शिळेखाली झाले. गेले तीन दिवसांपासून हे उभयचार प्राणी एकत्रित राहत आहेत. दरम्यान, यंदा सलग दुसऱ्या वर्षी यात्रेवर कोरोनाचे सावट असल्याने ही यात्रा भाविकांविना साजरी करावी लागत आहे. पाच दिवस चालणाऱ्या नागोबा यात्रेत माळी, कोळी, कुंभार, चर्मकार, न्हावी, मुस्लीम, लिंगायत, ब्राह्मण, मातंग आदी ११ जातींच्या मानकऱ्यांना विशेष मान दिला जातो. हे मानकरी पाच दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध प्रकारे सेवा देतात.
चौकट
सावरगावात ११ शिवालये
सावरगावला पुरातन वारसा आहे. येथे पुरातन नागोबा, दिगंबर जैन, शिवालये आहेत. गावाभोवताली मल्लीकार्जुन, महादेव , गुडेश्वर, तुकाई, कुंभार शिवमंदिर, पाटील शिवमळा, अक्कलकोटे शिवमळा, नागापूर मळा, ब्राह्मण मळा, मारुती मंदिर, गणेश मंदिर, पदमावती, विठ्ठल आदी ११ मंदिरात पाषाणाच्या महादेवाच्या पिंडी, नागोबाच्या मूर्ती पहावयास मिळतात. सावरगावला यापूर्वी नागापूर या नावाने ओळखले जात होते.