भूम : शहरातून गेलेल्या भूम-वारदवाडी , भूम - वाकवड मार्गे कुंथलगिरी, भूम ते परंडा या रस्त्याची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहनधारक त्रस्त असून, अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
कामास प्रारंभ
तुळजापूर : शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तुळजाभवानी मंदिर रस्ता, तुळजाभवानी मंदिर ते शुक्रवार पेठ येथील पाणी टाकी या दरम्यान सध्या पथदिव्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांसह भाविकांची गैरसोय दूर होणार आहे.
पदाधिकारी निवडी
कळंब : येथील श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या बैठकीत पदाधिकारी निवडी करण्यात आल्या. तालुका कार्याध्यक्षपदी अमर चोंदे, उपाध्यक्षपदी अशोक कुरूंदे, तालुकाध्यक्षपदी नितीन गायकवाड तर संघटकपदी अमोल मोरे यांची नियुक्ती करण्यात आली.
लसीकरण सुरू
(लसीकरण फोटो)
येडशी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविडची लस उपलब्ध झाली आहे. आठवड्यातील गुरूवार व शुक्रवारी ही लस दिली जाणार आहे. यासाठी ओळखपत्र घेऊन येण्याचे आवाहन येथील आरोग्याधिकारी डॉ. योगेश मोरे यांनी केले आहे.
पाणी टंचाई
नळदुर्ग : शहरात पालिकेच्या असलेल्या एकूण कूपनलिका पैकी निम्याहून अधिक कूपनलिका बंद आहेत. यामुळे अनेक भागात पाणी प्रश्न निर्माण होत असून, प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.