तामलवाडी (जि. उस्मानाबाद) - तुळजापुर तालुक्याती गंजेवाडी ते तामलवाडी या ५ किमी अंतराच्या रस्त्याची चाळण झाली आहे. रस्तावरील खडी खडी उखडल्याने वहातुकीस अडथळा निर्माण होत आहे. खराब रस्त्याचे कारण देत मागील चार वर्षांपासून तुळजापूर आगाराने बससेवा बंद केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसाेय हाेत असून पायपीट करीत शाळा गाठावी लागत आहे.
तुळजापूर आगाराची तुळजापूर ते नान्नज ही बस गंजेवाडी, वडगांव (काटी ) मार्गे धावत हाेती. मात्र गंजेवाडी ते तामलवाडी हा पाच किमी रस्ता खड्डेमय झाला आहे. परिणामी या मार्गावरील बससेवा चार वर्षांपासून बंद आहे. दरम्यान, यापैकी एक किमी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. परंतु, अतिवृष्टीमुळे हाही रस्ता खड्ड्यांत गेला आहे. परिणामी बससेवेसाेबतच खाजगी वाहतूकही विरळ झाली आहे. त्यामुळे विशेषकरून सायकलींची साेय नसलेल्या विद्यार्थीनींना पायपीट करून शाळा गाठावी लागत आहे.
चाैकट...
रस्त्याची केली पाहणी...
महामंडळाकडून खड्डेमय रस्त्याची पाहणी केली. परंतु, रस्त्याची दुरूस्ती हाेईपर्यंत बसेसवा सुरू करता येणार नाही, असे अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता लाेकप्रतिनिधींनी विशेष बाब म्हणून रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
काेट...
बससेवा बंद असल्याने अनेक मुलींना पायपीट करून तसेच सायकलवरून शाळा गाठावी लागत आहे. तसेच गावकर्यांनाही गैरसाेयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने रस्त्याची दुरूस्ती करावी.
-गणेश गंजे, सरपंच, गंजेवाडी.