तक्रारदार व त्यांचे दोन मित्र असे तिघांचे दुचाकी व चारचाकी वाहनाचे शिकाऊ परवाना काढण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये खाजगी आर.टी.ओ. एजेंटनी स्वत: यापूर्वी स्वीकारले होते. तक्रादार आणि त्याच्या एका मित्राचे दुचाकी व चारचाकी वाहनांची ड्रायव्हिंग टेस्ट ऑनलाईन तारीख घेऊन कायमस्वरुपी वाहन परवाना मिळवून देण्यासाठी परंडा येथील आर.टी.ओ. एजेंट ओंकार थोरबाेले यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदारास लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदाराने उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत पतिबंधक विभागाने परंडा येथे सापळा लावला. यावेळी एजेंट ओंकार थोरबोले ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडला. ही कारवाई उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे यांनी केली. या कामी त्यांना पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके, अविनाश आचार्य, चालक इरफान पठाण यांनी मदत केली.
आरटीओ एजंटाने घेतली ५ हजाराची लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 4:32 AM