उमरगा : सरपंचांनी गावाच्या गरजा ओळखून नि:स्वार्थ कार्य केल्यास गावाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही, असे मत राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोद्याचे माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी व्यक्त केले.
शांतिदूत परिवार व पंचायत समिती यांच्या वतीने शुक्रवारी उमरगा परिसरातील सरपंच व युवकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पेरे-पाटील बोलत होते. महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव अध्यक्षस्थानी होते. यावेळी शांतिदूत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा विद्याताई जाधव, डॉ. दा. ब. पतंगे, महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्यूटचे प्राचार्य रमाकांत पुठ्ठेवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी देवानंद वाघ, रोटरीचे अध्यक्ष डॉ. पंडित बुटुकणे, वन परिमंडळ अधिकारी तुकाराम डिगुळे, सामाजिक वनीकरण अधिकारी उमेश बिराजदार, कीर्तनकार अंजलीताई केंद्रे, आशुतोष महाराज, डॉ. सागर पतंगे, विद्यार्थी युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रा. युसुफ मुल्ला, शांतिदूतचे मराठवाडा अध्यक्ष प्रा. जीवन जाधव, सचिव संतोष जाधव उपस्थित होते.
प्रा. शफी मुल्ला व सौ. लक्ष्मी गायकवाड यांनी उत्तम देशभक्ती व ग्रामगौरव गीत सादर केले. डॉ. विठ्ठलराव जाधव यांनी प्रास्ताविक, प्रवीण स्वामी यांनी सूत्रसंचालन केले. विद्या जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. राम जाधव, बाबासाहेब सोनकांबळे, गणेश मोरे, उषाताई गायकवाड, रणजीत गायकवाड, ज्ञानेश्वर पाटील, श्रीराम जगदाले, शमशोद्दीन जमादार, सतीश जाधव, अरविंद कांबळे, प्रल्हाद इंगोले, संतोष कवठे, करीम शेख, मुस्तफा इनामदार, गणेश गरुड, किशोर औरादे, मुबीन शेख, श्रीनिवास पांचाळ, महादेव हाळे यांच्यासह सरपंच व ग्रामसेवक संघटनेने यासाठी पुढाकार घेतला.