अणदूर : बहुजन रयत परिषदेच्या वतीने येथे सावित्रीच्या लेकींचा सन्मान सोहळा पार पडला.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर येथील शाहू शिक्षण संस्थेच्या संचालिका ॲड. कोमल ढोबळे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शिवदास कांबळे, उद्योजिका अनिता गालफाडे, उद्योजक रमेश गालफाडे, अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे, महादेवप्पा आलुरे, डाॅ. अविनाश गायकवाड, समाज विकास संस्थेचे अध्यक्ष भूमिपुत्र वाघ, फकिरा दलाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष सतीश कसबे, बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर, बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड, सुमित कोथिंबिरे, चंद्रशेखर कंदले, माजी सरपंच बिरू दुधभाते आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. जयश्री घोडके, डॉ. आकांक्षा गायकवाड, बाबई चव्हाण, वंदना घोडके, गोदावरी क्षीरसागर, वैशाली घुगे, सीमा दुदगी, अनिता मुदकन्ना, अन्नपूर्णा मोरे, शाहिदाबी सय्यद, विद्याताई वाघ, कविता पुदाले, सानिया शेख, लता बंडगर, जोशिलाताई लोमटे, प्रियंका पासले, अनिता काळुंके, नागिनी सुरवसे, कस्तुरा कारभारी, वंदना भगत, बबिता महानोर आदींचा सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन डॉ. संतोष पवार यांनी केले. ईश्वर क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी माणिक निर्मळे, सुनील क्षीरसागर, उमेश गायकवाड, सिकंदर शेख, दत्तात्रय गायकवाड, प्रदीप पाटील, पुष्पक कसबे, इमाम शेख यांनी पुढाकार घेतला.
फोटो-- अणदूर येथे सावित्रीच्या लेकींचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, ॲड. कोमल साळुंके, अनिता गालफाडे, रमेश गालफाडे, रामचंद्र आलुरे आदींची उपस्थिती होती.