कसबे तडवळे : येथील जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीने ‘एक रुपया तुमचा, गणपती बाप्पा आमचा’ या उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी प्रत्येक कुटुंबाना प्रत्येकी एक मूर्ती या प्रमाणे तीन हजार तीनशे गणेश मूर्तींचे वाटप करण्यात आले. तसेच यातून जमा झालेली रक्कम गावातील श्रीराम मंदिर प्रवेशद्वाराच्या जिर्णोध्दारासाठी देण्यात आली.
‘एक रुपया तुमचा, गणपती बाप्पा आमचा’ या उपक्रमातून गणेश भक्तांकडून बंदिस्त बॉक्समध्ये रक्कम जमा करण्यात आली होती. ही रक्कम खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, तालुका प्रमुख सतिश सोमाणी यांच्या हस्ते श्री राम मंदिरच्या प्रवेशद्वार जिर्णोध्दाराच्या कामासाठी रामचंद्र महाराज तडवळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी शंकर होगले, माजी उपसरपंच विजयसिंह जमाले, तुळशीदास जमाले, जयभवानी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश जमाले, पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, किशोर डाळे, डॉ. धनंजय करंजकर, डॉ. उमाकांत सुतार, पांडुरंग विभुते, मनोज जमाले, शिवाजी नाळे व गणेश भक्त उपस्थित होते.
110921\img-20210910-wa0031.jpg
मंदिरच्या प्रवेशद्वार जीनोर्धनाच्या कामासाठी रामचंद्र महाराज तडवळकर यांच्या कडे सपूर्त करताना खा.ओमराजे निबांळकर,आमदार कैलास पाटील