उमरगा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून पूरग्रस्त भागातील केवडाई व धामणीची वाडी (ता. पोलादपूर, जि. रायगड) येथील सर्व कुटुंबांना १५ दिवस पुरेल इतके अन्नधान्य, किराणा साहित्य व दैनंदिन संसारोपयोगी साहित्य पाठविण्यात आले.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर झालेल्या कार्यक्रमात माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून हे सर्व साहित्य असलेला टेम्पो रवाना करण्यात आला. यात प्रामुख्याने औषधे, तांदूळ, डाळ, तेल, साखर, चहा पावडर, मीठ, तिखट, मसाले, केळी, भाजीपाला, कुरकुरे, चुरमुरे, बिस्किट बॉक्स, चादरी, गाद्या, पाणी बाटल्या, साबण, सॅनिटरी पॅड आदी साहित्याचा समावेश आहे. कार्यक्रमास किरण गायकवाड, डॉ. उदय मोरे, ॲड. प्रवीण तोतला, बाजार समितीचे सभापती मोहियोद्दिन सुलतान, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार, उद्योजक बळीराम सुरवसे, शेतकरी सेना जिल्हा संघटक विलास भगत, शेतकरी सेना तालुकाप्रमुख बलभीम येवते, विजयकुमार नागणे, महावीर अण्णा कोराळे, अशोक इंगळे, बाजार समिती संचालक सचिन जाधव, व्यंकट पाटील, विधानसभा अध्यक्ष शरद पवार, योगेश तपसाळे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र सुरवसे, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, शिवसेना विभागप्रमुख आप्पाराव गायकवाड, प्रदीप शिवनेचारी, दत्ता डोंगरे, शरद इंगळे, लिंगराज स्वामी, खय्युम चाकुरे, गोपाळ जाधव, ज्ञानेश्वर पाटील, मनोज जाधव, बालाजी जाधव, सुधाकर भोसले, श्रीधर घोटाळे, भीमाशंकर गायकवाड, विजय भोसले, सौदागर सूर्यवंशी, हैदर शेख, महादू क्षीरसागर, योगेश शिंदे, कृष्णा मुळे, मुजीब इनामदार, ज्ञानेश्वर सांगवे, आकाशराजे, पंकज जगताप आदी उपस्थित होते.
दरम्यान, पूरग्रस्त भागात कार्य व श्रमदान करण्यासाठी नगरसेवक पंढरीनाथ कोणे, शरद पवार, संदीप चौगुले, दौलत सुरवसे, नागेश मंडले, अतुल घंटे, राहुल अष्टीकर हे शिवसैनिक देखील रवाना झाले आहेत.