उमरगा : शिवसेनापक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सध्या राज्यभरात शिवसंपर्क अभियान सुरू आहे. या अभियानास माेठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत सर्वसामान्यांचे हित हेच सेनेचे ध्येय आहे, असे मत आमदार तथा जिल्हा प्रमुख कैलास पाटील यांनी व्यक्त केले.
जिल्हा शिवसेनेच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यात युवा सेनेच्या ५१ शाखा स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकीच उमरगा तालुक्यातील वरनाळवाडी येथे युवा सेनेच्या शाखेची स्थापना करण्यात आली. यावेळी ते बाेलत हाेते. शाखाप्रमुख म्हणून कल्याण घुरघुरे यांची नेमणूकही केली.
आमदार कैलास घाडगे पाटील म्हणाले की, युवा सैनिकांनी जुन्या शिवसैनिकांना विश्वासात घेत पक्षवाढीसाठी व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करावेत. महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून कोरोना आजारासह चक्रीवादळ आदी संकटांना आपण सामोरे गेलो आहोत. या सर्व संकटांच्या काळात मुख्यमंत्र्यांनी एक कुटुंबप्रमुख या नात्याने समर्थपणे ही जबाबदारी पार पाडलेली आहे. शिवभोजनसारख्या योजनेमुळे संकटकाळातही गाेरगरिबांना अत्यंत अल्प दरात एकवेळचे जेवण देण्यात आले. सरकारची ही कामे शिवसैनिक तसेच युवासैनिकांनी जनतेपर्यंत पाेहोचवावीत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड, युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, उपतालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक शेखर मुदकांना, युवासेना विधानसभा अध्यक्ष शरद पवार, उपतालुकाप्रमुख जगन पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख तथा नगरसेवक अजित चौधरी, श्रद्धानंद माने-पाटील, संतोष सोमवंशी, माजी सरपंच टिपन्ना मातोळे, बाबू शिर्शिकर, भीमशा घुरघुरे, सरपंच डॉ. सागर इंगळे, संभाजी इंगळे, संतोष मुगळे, रवी अंबुसे, जगदीश निंबरगे, मौलाली नदाफ, महादेव उडचणे, फयाज शेख, श्रावण इंगळे आदी उपस्थित हाेते.