सात सदस्यांची ही ग्रामपंचायत असून, जानेवारी २०२१ मध्ये झालेल्य निवडणुकीत पाच सदस्य बिनविरोध तर दोन सदस्यांसाठी निवडणूक झाली होती. त्यानंतर सरपंच पदी ज्योती साळुंखे तर उपसरपंच पदी प्रवीण ठोंबरे यांची निवड करण्यात आली. दरम्यान, काही दिवसातच प्रवीण ठोंबरे यांनी सदस्य व उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी मंगळवारी ग्रामपंचायत सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी लक्ष्मी गपाट व शिवाजी गोंदवले यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. परंतु, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी ज्योती साळुंखे, बाप्पा चव्हाण, शिवाजी गोंदवले हे तीनच सदस्य उपस्थित होते. त्यामुळे उपसरपंचपदी शिवाजी गोंदवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी संजय स्वामी, तलाठी नीळकंठ केदार, ग्रामसेवक रमेश हुबे यांनी काम पाहिले. तर पोहेकॉ अच्युत कुटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी बप्पासाहेब चव्हाण, ज्योती साळुंखे, आसरू साळुंके, धनराज चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
उपसरपंचपदी शिवाजी गोंदवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 5:10 AM