ईट (जि. धाराशिव) : भूम तालुक्यातील ईट येथील व्यापाऱ्याचे घर फाेडून चाेरटे आत घुसले. घरातील एका महिलेने त्यांना प्रतिकार केला असता, धारदार चाकूने चेहऱ्यावर सपासप वार केले. यानंतर घरातील सुमारे २० ताेळे वजनाचे सुवर्ण दागने घेऊन चाेरटे पसार झाला. ही थरारक घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. माहिती मिळताच वाशी ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकासही पाचारण करण्यात आले हाेते. मात्र, त्यास माग गवसला नाही.
ईट येथील प्रतिष्ठित व्यापारी अमाेल कृषी सेवा केंद्राचे मालक विजयकुमार देशमुख यांचे दाेन मजली घर आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास कुटुंबीय झाेपेत असतानाच चाेरट्यांनी घरात प्रवेश केला. आवाज आल्याने घरातील महिलेस जाग आली. त्यांनी उठून पाहिले असता, घरात चाेरटे शिरल्याचे दिसले. त्यांनी चाेरट्यांना प्रतिकार करण्यास सुरूवात केली असता, एकाने हातातील धारदार चाकुने त्यांच्या चेहऱ्यावर वार केले. यानंतर आतील सुमारे २० ताेळे वजनाचे दागिने घेऊन चाेरटे पसार झाले. घटनेची माहिती मिळताच भूम उपविभागीय पाेलीस अधिकारी, वाशी ठाण्याचे पाेलीस निरीक्षक सहकाऱ्यांसीह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर ठसे तज्ज्ञ, श्वान पथकासही पाचारण करण्यात आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांत प्रचंड भीती निर्माण झाली आहे.
श्वान घराभाेवतीच घुटमळले...चाेरीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पाेलिसांनी श्वान पथकाच पाचारण केले. हे श्वान घराभाेतीच घुटमळले. त्यामुळे तपासासाठी पुरक चाेरट्यांचा माग पाेलिसांना श्वान पथकाच्या माध्यमातून मिळू शकला नाही, हे विशेष.