शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

आठ दिवसांच्या द्वंद्वानंतर तुळजाभवानीचे महिषासुरमर्दिनी रूप प्रकटले, महिषासुराचा वध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 12:08 PM

आक्रमक स्वरूपात महिषासुरमर्दिनीचे रूप धारण करून तुळजाभवानी देवी महिषासुराचा वध करते, अशी आख्यायिका सांगितली जाते.

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : सलग आठ दिवसांच्या द्वंद्वानंतर तुळजाभवानी देवीने महिषासुरमर्दिनी रूप घेत दैत्याचा वध केला होता. हे औचित्य साधून नवरात्रातील आठवी माळ अर्थात दुर्गाष्टमीला भोपी पुजारी बांधवांनी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडली होती. या लक्षवेधी पूजेचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. यानंतर यजमान जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या हस्ते पूर्णाहुतीसाठी होमशाळेतील होम प्रज्वलित करण्यात आला.

दुर्गाष्टमीनिमित्त तुळजाभवानी देवीचे मंदिर रात्री दीड वाजता उघडण्यात आले. चरणतीर्थ विधी झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. सकाळी पंचामृत अभिषेक पूजा संपल्यानंतर महंत, भोपी पुजारी दिनेश परमेश्वर, अतुल मलबा, समाधान परमेश्वर, संकेत पाटील व पाळीचे पुजारी राजाभाऊ कदम यांनी देवीची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा बांधली. या महापूजेत श्री तुळजाभवानी हातात त्रिशूल घेऊन महिषासुराचा वध करीत आहे, तर देवीचे वाहन सिंह हा महिषासुराचे वाहन मेष याच्यावर हल्ला करून त्याचा वध करीत आहे. या पूजेसाठी देवीला पैठणी महावस्त्राबरोबर विविध प्रकारचे सुवर्णालंकार घालण्यात आले होते.

सर्व देवदेवतांनी दिली शक्ती...पार्वतीरूपी तुळजाभवानी गेले आठ दिवस दैत्यराज महिषासुर याच्याबरोबर द्वंद करीत असते; परंतु रक्तबीज वरदान प्राप्त असलेल्या महिषासुराचा वध अशक्य होतो. यामुळे सर्व देवदेवता एकत्रित येऊन तुळजाभवानीस सर्व शक्ती देऊन महिषासुरमर्दिनीचे वेगळे रूप देतात. यानंतर आक्रमक स्वरूपात महिषासुरमर्दिनीचे रूप धारण करून तुळजाभवानी देवी महिषासुराचा वध करते, अशी आख्यायिका सांगितली जाते. याचेच प्रतीक म्हणून महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडली जाते.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादNavratriनवरात्री