उमरगा: येथील रोटरी क्लब व या अंतर्गत कार्यरत रोटरॅक्ट क्लब, इंटरॅक्ट क्लब, नेहरू युवा केंद्र, उमेद अभियान आणि एकुरगावाडी येथील श्री छत्रपती शिवाजी बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने युवकांना जलसाक्षर मोहिमेत सहभागी करून घेत घेऊन चर्चा अभियान सुरू करण्यात आले आहे.
याअंतर्गत जिजाऊ रोटरॅक्ट क्लबच्या वतीने जागतिक जल दिनानिमित्त येथील वृ़ंदावन नगर येथे क्लबच्या अध्यक्ष अंजली चव्हाण व सचिव राणी बेंबळगे यांनी मुलीना जलसाक्षर या विषयावर आपली मते मांडण्यासाठी प्रवृत्त करून चर्चा घडवून आणली. यावेळी रोटरी इंडिया वॉटर मिशन डिस्ट्रिक्ट ३१३२ चेअरमन प्रा. डॉ. संजय अस्वले यांची प्रमुख उपस्थिती होती. या चर्चेमध्ये हॉकी खेळाडू रेणुका बेंबळगे, राजनंदिनी भोसले आदी मुलींनी पुढाकार घेतला. महाविद्यालयात रोटरॅक्ट क्लबच्या कुमारी चौगुले, मेघा पाटील, वैष्णवी गाडे, प्रतीक्षा सूर्यवंशी यांनी ‘ पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाण्याचा योग्य व पुनर्वापर या विषयावरील परखड विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिजाऊ रोटरॅक्ट्च्या सचिव राणी बेंबळगे यांनी केले तर आभार चौगुले यांनी मानले.