उमरगा - शहरात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी नगरपालिकेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भव्य पुतळा उभारण्यात येईल, असे आश्वासन शुक्रवारी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी मातंग समाजबांधवांसोबत झालेल्या बैठकीत दिले. यानंतर समाजबांधवांनी फटाके फाेडून पालिकेच्या निर्णयाचे स्वागत केले.
मातंग समाज स्मारक समितीच्या वतीने अनेक वर्षांपासून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसविण्यात यावा, या मागणीसाठी पाठपुरावा सुरू हाेता. त्यानुसार नगर परिषदेने पुतळा बसविण्यास मंजुरी दिली आहे. दरम्यान, मातंग समाजबांधवांनी शुक्रवारी दुपारी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांची भेट घेतली. यावेळी शरण पाटील यांनी पुतळा लवकरात लवकर उभारण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी नगराध्यक्ष प्रेमलता टोपगे, पंचायत समिती सभापती सचिन पाटील, नगरसेवक महेश माशाळाकर, नगरसेविका ललिता सरपे, मातंग समाज स्मारक समितीचे अध्यक्ष संजय सरवदे, कार्याध्यक्ष राजाभाऊ शिंदे, उपाध्यक्ष सतीश कांबळे, नेताजी गायकवाड, संजय कांबळे, शिवाजी दुंनगे, शिवाजी गायकवाड, बालाजी गायकवाड, संजय क्षीरसागर, दत्ता कांबळे, राजू गायकवाड, प्रवीण शिंदे, विलास कांबळे, विजय कांबळे, मारुती नरशिंगे, सीताराम कांबळे, मंगेश देढे, योगेश राठोड, किरण गायकवाड, देवराज संगुळगे, अनिल सगर, बाबा मस्के आदींची उपस्थिती हाेती.