शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

‘तू तुझ्या औकातीत रहा’, खा. ओमराजे निंबळकर अन् आ. राणा जगजितसिंह पाटील पुन्हा भिडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2022 5:58 PM

आज बऱ्याच वर्षांनंतर खा. ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील हे आमने-सामने आले होते.

उस्मानाबादः जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पीकविम्याबाबतच्या बैठकीत शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर आणि तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील पुन्हा भिडले. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्यासमोरच दोघांतील उफाळलेला वाद अरेतुरेच्या भाषेपर्यंत गेला. खा. ओमराजे  निंबाळकर आणि आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्यात एकमेकांची औकात काढण्यापर्यंत प्रकरण गेले. ‘तू तुझ्या औकातीत राहा. तुझी आणि तुझ्या खानदानाची औकात सगळ्यांना माहीत आहे,’ अशा शब्दांत खा. ओमराजेंनी राणा जगजितसिंह पाटलांना सुनावले. 

उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणात निंबाळकर-पाटील हा जुनाच वाद आहे. पवनराजे निंबाळकर हत्याकांडानंतर तर हा वाद वेगळ्या वळणावर गेला. आता दुसऱ्या पिढीतील लोकप्रतिनिधीही जेव्हाजेव्हा समोरसमोर येतात तेव्हातेव्हा पुन्हा वाद उफाळून येतोच. आजही जिल्हाधिकारी कार्यालयात आज तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची पीकविम्याच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होती. या बैठकीलानंतर शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरही पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्यास सुरूवात केली. तसेच या बैठकीला लोकप्रतिनिधींना का बोलावण्यात आले नाही, असा सवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केला. यावर आ. राणा यांनी ओमराजेंना उद्देशून ‘बाळा लोकप्रतिनिधी नसतो रे’ असे म्हटले. 

हे ऐकून ओमराजेंचा पारा चढला. ‘तू नीट बोल, बाळ म्हणू नकोस. तुझ्या औकातीत राहा, तू आणि तुझ्या खानदानाची औकात आणि संस्कार सर्वांनाच माहीत आहे. तू नीट बोल’ अशा शब्दांत ओमराजेंनी राणा जगजितसिंह पाटील यांना सुनावले. यावर ‘बाळच आहेस तू’ असा टोमणा आ. राणा यांनी मारला. संतापलेल्या ओमराजेंनी पुन्हा ‘तुमचे संस्कार, तुमची औकात सगळे माहीत आहे. तुला बोललेलो नाही. मला तुला बोलायचे कारणही नाही’ असा एकेरी उल्लेख करत सुनावले. या दोन लोकप्रतिनिधींमध्ये सुरू असलेली ही हमरीतुमरी पाहून जिल्हाधिकारी सचिन ओमबासेही चक्रावले. त्यांनी दोन्ही लोकप्रतिनिधींना शांत करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादShiv SenaशिवसेनाBJPभाजपा