शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
2
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
3
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
4
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
5
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाले?
6
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
7
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
8
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
9
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
10
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
11
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
12
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
13
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
14
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
15
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
16
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
17
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
18
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
19
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
20
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 

उस्मानाबादेत १०० ब्रास वाळू, सॅण्डक्रशचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 7:55 PM

उस्मानाबाद शहरात काही मंडळी अशा स्वरूपाची कुठलीही परवानगी न घेता, रस्त्यालगत म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी वाळू, सॅण्डक्रशचा साठा केला हाेता.

ठळक मुद्देसार्वजनिक ठिकाणी अवैधरीत्या साठामहसूल विभागाची कारवाई 

उस्मानाबाद : मागील तीन-चार दिवसांपासून महसूल विभागाने गाैण खनिजाचे अवैध उत्खनन तसेच अवैधरीत्या वाळू, सॅण्डक्रश साठा करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची माेहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवारी तहसीलदार यांच्या निर्देशानुसार पथकाने उस्मानाबाद शहरातील सार्वजनिक ठिकाणी साठविलेली सुमारे १०० ब्रास वाळू, सॅण्डक्रश जप्त करण्यात आले.

सार्वजनिक ठिकाणी वाळू अथवा सॅण्डक्रश आदी गाैण खनिजाचा साठा करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी यांची परवानगी लागते. परंतु, उस्मानाबाद शहरात काही मंडळी अशा स्वरूपाची कुठलीही परवानगी न घेता, रस्त्यालगत म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी वाळू, सॅण्डक्रशचा साठा केला हाेता. ही बाब महसूल विभागाला समाजल्यानंतर तहसीलदार गणेश माळी यांनी साठेबाज व्यक्तींविरुद्ध कारवाई करून वाळू व सॅण्डक्रश जप्त करण्याचे आदेश दिले हाेते. त्यामुळे पथक शनिवारी सकाळी स्पाॅटवर दाखल झाले. साठा माेठ्या प्रमाणात असल्याने स्वत: तहसीलदार माळी हेही स्पाॅटवर पाेहाेचले. यावेळी पथकाने चाैकशी केली असता, सुमारे १०० ब्रासपेक्षा अधिक वाळू व सॅण्डक्रशचा साठा केल्याचे समाेर आले. यानंतर पथकाने हा सर्व साठा जप्त करून जेसीबीच्या साहाय्याने उचलला. दरम्यान, महसूल विभागाच्या वतीने सदरील वाळू तसेच सॅण्डक्रशचा लिलाव केला जाणार असल्याचे तहसीलदार माळी यांच्याकडून सांगण्यात आले.

परवानगीचा पत्ता नाही...काही मंडळी गुजरात तसेच अन्य राज्यांतून वाळू आणून साठा करीत आहे. यानंतर ही वाळू अव्वाच्या सव्वा दराने विक्री केली जाते. दरम्यान, अशा प्रकारे साठा करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी यांची रितसर परवानगी घ्यावी लागते. परंतु, त्याकडे काणाडाेळा करून वाळूसह सॅण्डक्रशचा अवैधरीत्या साठा करण्यात आला हाेता. रितसर परवानगी नसल्यानेच हा साठा जप्त केला.

जप्त साठ्याचा लिलाव केला जाईलपरवानगी न घेता वाळू, सॅण्डक्रशचा साठा केल्याचे समाेर आल्यानंतर पथकास कारवाईचे आदेश दिले हाेते. त्यानुसार शनिवारी कारवाई करण्यात आली आहे. जवळपास १०० ब्रासपेक्षा अधिक साठा जप्त केला आहे. प्रशासनाच्या वतीने सदरील वाळू तसेच सॅण्डक्रशचा लिलाव केला जाईल.- गणेश माळी, तहसीलदार, उस्मानाबाद

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबादRevenue Departmentमहसूल विभाग