उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरात मटका, जुगार, ऑनलाइन लॉटरी असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून, यामुळे तरुणपिढी व्यसनाधिनतेकडे वळत असल्याने प्रशासनाने लक्ष घालून अवैध धंदे बंद करावे, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले, शासन मान्यता नसतानाही अनेक ठिकाणी मटका, जुगार, ऑनलाइन लॉटरी असे अवैध धंदे सुरू केले आहेत. व्यसनाधिनतेच्या आहारी जाऊन गोर-गरीब कुटुंब आर्थिक अडचणीत येत आहेत. मात्र, यावर संबंधित विभागाचे नियंत्रण नसल्याने व्यवसाय राजेरोसपणे सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून अवैध धंदे बंद करण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन २५ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी शहर प्रमुख संजय उर्फ पप्पू मुंडे, दिलीप जावळे, पंकज पाटील, तुषार निंबाळकर, राजाभाऊ पवार, विजय ढोणे, बंडू आदरकर, बाळासाहेब शिनगारे, सचिन शिंदे, भीमराव भालेकर आदी उपस्थित होते.