ढोकी : येथे पोलिस प्रशासनाकडून संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारी अत्यावश्यक सेवेमधील दुकाने वगळता सर्व बाजारपेठ बंद होती. यामुळे गावात शुकशुकाट पसरला होता.
यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिगेट्स लावून बंदोबस्त ठेवला आहे. ढोकी गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर तसेच पेट्रोल पंप चौकात बॅरेकेट्स लावून विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई केली.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून संचारबंदी जाहीर होताच ढोकी पोलिसांनी धडक मोहीम हाती घेऊन विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला. पोलीसांनी धडक मोहीम हाती घेतल्यानंतर ढोकीमधील रस्ते निर्मनुष्य झाले. अत्यावश्यक सेवामध्ये काम करणाऱ्या लोकांना यातून सुट देण्यात आलेली आहे. तसेच दवाखाने, औषधे तसेच शेतात काम करणाऱ्या लोकांना या संचारबंदीत सेवा देण्याची मुभा ठेवण्यात आली आहे.