उमरगा - सासरच्या लोकांनी, शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचे जाचाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री कवठा येथे घडली. मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या पाच जणांविरुद्ध उमरगा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोकुळ तालुका बसवकल्याण, जिल्हा बीदर येथील सूर्यकांत शामण्णा मटगे यांच्या मुलीचा विवाह उमरगा तालुक्यातील कवठा येथील युवराज लिंबारे यांच्याशी झाला होता. सोमवारी सायंकाळी मुलगी दिपाली (वर २० वर्ष) हिने गळफास लावून आत्महत्या केली आहे. मंगळवारी सकाळी उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर कवठा येथे अंत्यविधी उरकण्यात आला. मयत मुलीचे वडील सूर्यकांत उर्फ शिवराम शामण्णा मटके यांनी उमरगा पोलीसात फिर्याद देऊन, मुलगी दिपाली हिचे लग्न झाल्यावर एक वर्षापर्यंत सासरच्या लोकांनी मुलीला व्यवस्थित नांदवले. त्यानंतर तुझ्या माहेरून गाडी घेण्यासाठी पैसे घेवून ये म्हणून सतत जाचहट्ट करुन उपाशी पोटी ठेवुन तिला शारिरीक आणि मानसिक त्रास देत होते. त्यामुळे दिपालीने आत्महत्या केली आहे. दिपालीच्या मरनास कारणीभूत होनारे कविता माधव लिंबारे (सासू), माधव लिंबारे (सासरा), लिंबराज माधव लिंबारे (दिर), अतुल माधव लिंबारे (दिर), युवराज माधव लिंबारे (नवरा) (सर्व रा कवठा) यांच्या विरूध्द पोलीसात फिर्याद दिल्यानंतर पाच जणांवरती गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीना अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक रमाकांत शिंदे करीत आहेत.