भूम तालुक्यातील बावी येथील प्रतीक्षा यांचा सरंमकुंडी येथील कृष्णा हाके यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर पती कृष्णा बिभीषण हाके, दीर आकाश हाके, धनू हाके, मुक्ताबाई हाके, चिमणाबाई हाके यांनी २०१८ पासून लग्नात राहिलेल्या हुंड्याच्या पैसे आणण्यासाठी तसेच माहेरकडील लोक योग्य मानपान देत नसल्याच्या कारणावरुन वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ करीत होते. त्यांच्या छळास कंटाळूनच प्रतीक्षा हाके यांनी स्वत:च्या विहिरीतील पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद प्रतीक्षा यांचे वडील सोमनाथ कांबळे यांनी २३ डिसेंबर रोजी भूम पोलीस ठाण्यात दिली. यावरुन सासरकडील नमूद व्यक्तींविरुध्द गुन्हा नोंद झाला.
दगडफेकीचा जाब विचारल्याने तिघास मारहाण
उस्मानाबाद : चार व्यक्तींने एका घरावर दगड फेक केली होती. याचा जाब विचारण्यास गेलेल्या तिघास बेदम मारहाण झाली. ही घटना उस्मानाबाद शहरात २३ डिसेंबर रोजी घडली.
उस्मानाबाद शहरातील हनुमान चौक परिसरात राहणाऱ्या सुनंदा भारती यांच्या घरावर गल्लीतीलच रोहिदास सौदागर, बालाजी चौरे, शिवाजी चौरे, सारीका सौदागर या चौघांनी दगड फेक केली. याचा जाब सुनंदा भारती यांच्यासह त्यांच्या मुलगा रामेश्वर व घनश्याम यांनी विचारला असता. यावर चिडून उपरोक्त चौघांनी तिघांना काठीने मारहाण केली, अशी फिर्याद सुनंदा भारती यांनी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात २४ डिसेंबर रोजी दिली. यावरुन उपरोक्त चौघांविरुध्द गुन्हा नोंद झाला.