काँग्रेस आक्रमक : जिल्हा कचेरीसमाेर निदर्शने
उस्मानाबाद : पत्रकार अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे, पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामींना घटनेच्या तीन दिवस आधीच होती, असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामी यांच्याकडे कशी आली? असा सवाल करीत देशाच्या संरक्षणविषयक महत्त्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, संघटक राजेंद्र शेरखाने, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सय्यद खलील, प्रशांत पाटील, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, दर्शन कोळगे, युवक प्रदेश सचिव उमेश राजेनिंबाळकर, महेबूब शेख, खुद्दुस सिद्दीकी, हरिभाऊ शेळके, मिलिंद गोवर्धन, विश्वजीत शिंदे, राहुल लोखंडे, अभिजीत देडे, प्रसन्न कथले, कृष्णा तवले, सचिन धाकतोडे, समाधान घाटशिळे, सुरेंद्र पाटील, मेहराज शेख आदी उपस्थित हाेते.