शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

सवाष्ण भोजनात पुरणपाेळीचा अस्वाद घेतलेल्या ३० सुवासिनींना विषबाधा

By बाबुराव चव्हाण | Updated: February 8, 2024 13:21 IST

एकूण ३० महिलावर उपचार सुरू असून सर्वाची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

कळंब (जि. धाराशिव) - तालुक्यातील परतापूर येथे सवाष्ण भोजनाच्या कार्यक्रमात पुरणपोळीचा आस्वाद घेतलेल्या ३० सुवासिनींना अन्नातून विषबाधा झाली. त्यांच्यावर धाराशिव येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

विविध कुलाचार, कुळधर्म , व्रतवैकल्ये करताना तसेच घरात शुभविवाह कार्य झाल्यावर, शेतातील देवतांची आराधना करण्यासाठी सवाष्ण भोजन कार्यक्रम करण्याची परंपरा आहे. विशेषतः कळंब तालुक्यातील ग्रामीण भागात ही प्रथा अधिक जोपासली जाते. तालुक्यातील कळंब बार्शी राज्यमार्गावरील परतापूर या जवळपास सातशे लोकसंख्या व तीनशेच्या आसपास उंबरठा असलेल्या गावातील तानाजी शिवाजी गायकवाड यांच्या कुंटूबाने रविवारी सायंकाळी असाच सवाष्ण भोजनाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. 

यासाठी गावातील आप्तस्वकीयांना भोजनाचे निमंत्रण दिले होते. यात पुरणपोळी, आमटी, भात असा प्रचलित मेन्यू होता. या भोजनाचा निमंत्रित असलेल्या अनेक महिला सुवासिनींने आस्वाद घेतला. मात्र, रात्री यापैकी काही महिलांना अस्वस्थ वाटू लागले. उलटी, मळमळ असा त्रास होवू लागला. यानंतर एकमेकींना विचारपूस सुरू झाली. त्रास वाढल्यानंतर मात्र दवाखान्याची वाट धरण्यात आली.

पीएचसी टू सिव्हील, ऑल स्टेबलसवाष्ण भोजनाच्या कार्यक्रमात जेवल्यानंतर त्रास सुरू होत असणारांची संख्या वाढू लागली. त्यानंतर मंगळवारी रात्रीनंतर सर्व रूग्णांना एकत्रीत येरमाळा येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात दाखल करण्याचा प्रयत्न झाला. तेथे पाच महिलांना अधिकचा त्रास होवू लागला . यामुळे बुधवारी सकाळी सर्वच महिलांना धाराशीव येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तेथे एकूण ३० महिलावर उपचार सुरू असून सर्वाची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

प्रत्येकीला वाटले हा त्रास आपल्यालाच...रविवारी रात्री सवाष्ण भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर एकेका महिलेला त्रास होवू लागला . मात्र, याची व्याप्ती माहिती नसल्याने जसा त्रास होईल तसे प्रत्येकाने आपआपले फॅमिली डॉक्टर गाठले. यामुळे सोमवार , मंगळवारपर्यंत याची व्याप्ती लक्षात आली नाही. शिवाय कारण पण लक्षात आले नाही. याची चर्चा झाल्यानंतर परत बुधवारी सर्वांवर एकत्रीत उपचार सुरू झाले .

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादfood poisoningअन्नातून विषबाधा