गुंजोटी
: उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील जागृत देवस्थान असलेल्या महादेव (घंटामठ) मंदिराच्या कळस जीर्णोध्दारासाठी गावच्या लेकींनी पुढाकार घेतला असून, यासाठी देणगीच्या स्वरूपात प्रत्येकी अकरा हजार रुपये जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यातून लवकरच कळसबांधणीचे काम पूर्ण करून घेण्याचा निर्धार या लेकींनी केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून येथील महादेव मंदिराच्या कळसाचे काम थांबले होते. आता गावच्या लेकींनी पुढाकार घेतल्यामुळे लवकरच कळसाचे काम पूर्ण होईल असे बोलले जात आहे. यासाठी धोंडाबाई स्वामी, पुतळाबाई स्वामी, महादेवी कारभारी, तुळसाबाई व्हटकर, दीपाली व्हलदुरे, फुलाबाई मुरमे, कांताबाई हरगुळे, अनिता हरगुळे, तनुजा हरगुळे, कमलबाई कलशेट्टी, साधना टोम्पे, वंदना टोम्पे, निर्मला चौधरी, धानम्मा स्वामी, मीनाक्षी स्वामी या महिलांची नुकतीच बैठक पार पडली. याप्रसंगी प्रत्येकीने निधी जमा करून हे काम मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीस गावच्या लेकींसोबतच घंटामठ समितीचे सचिव बसप्पा माळगे, शंकरराव पाटील, रवींद्र ढंगे, शाहूराज बोळे, रमेश चौधरी, शैलेश माळगे,रवींद्र देशमुख, दिनकर पाटील, गुरांना साखरे, सुदर्शन पाटील, काशीनाथ चौधरी, मोहन टोम्पे, बाबूराव कलशेट्टी, गणेश स्वामी, शिवराया पाटील, मल्लिकार्जुन हरगुळे, इंद्रजित म्हेत्रे, महेश देशमुख, भीमा कारभारी, विजय स्वामी, पिंटू साखरे, स्वप्निल देशमुख, प्रभाकर बोळे, अमोल मुरमे, वैजनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.
फोटो- गुंजोटी येथील मंदिराच्या (घंटामठ) जीर्णोध्दारासाठी एकत्र आलेल्या गुंजोटीच्या लेकी.