धाराशिव : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शासकीय कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले आहेत. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध प्रकारचे आंदोलने केली जात आहे. सोमवारी संपाच्या सातव्या दिवशी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जिल्हाकचेरीसमोर थाळीनाद आंदोलन केले. थाळीनादाने संपूर्ण परिरसर दणाणून गेला.
जुनी पेन्शन बाबत शासनाकडून अद्याप कुठलाही तोडगा काढला जात नसल्याचा आरोप करीत शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केले. या आंदोलनात हाती थाळ्या घेऊन विविध विभागातील शासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरकार संपाबाबत तोडगा काढण्याऐवजी संपात फूट पाडण्याचे काम करीत आहे. जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही, तोवर संपातून माघार घेणार नसल्याचा पवित्रा शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.