धाराशिव : नगरपंचायतकडून निधीचे असमान वाटप होत असल्याचा आरोप करीत लोहारा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका मयुरी बिराजदार यांनी मंगळवारी शहरातील प्रभाग क्रमाक ६ पासून नगरपंचायत कार्यालयापर्यत लोटांगण घालत आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदविला.
लोहारा शहरासाठी शासनाने दिलेल्या निधीचे असमान वाटप करुन शहरातील काही प्रभागांना नगरपंचायतकडून दुय्यम वागणूक दिली जात आहे. शिवाय, प्रभागातील स्वच्छता, दिवाबत्ती, पाणीपुरवठा याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. असाच प्रकार प्रभाग क्रमाक ६ च्या बाबतीतही होत असल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका मयुरी बिराजदार यांनी प्रभाग ६ पासून महात्मा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगरपंचायत कार्यालयापर्यत लोटांगण घालत आंदोलन केले.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शहप्रमुख सलीम शेख, माजी नगरसेवक शाम नारायणकर, युवक काँग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, शिवदूत महेबूब गवंडी, प्रेम लांडगे, दिनेश गरड, महेश बिराजदार, अंकुश परिट, गोविंद बंगले, अक्षय सगट, महेश चपळे, विलास जेवळीकर यांच्यासह प्रभाग क्रमांक सहामधील संगीता स्वामी, निलावती भोकरे, मंगल स्वामी, बानुभाभी फुटाणकर, उज्वला बिराजदार, मंगल निर्मळे, निर्मला निर्मळे, भामाबाई बंगले, सुजाता पाटील, लक्षी घोडके, मनिषा पोतदार, राजू स्वामी, रघुवीर घोडके, शरण्णाप्पा स्वामी, मन्मथ स्वामी, अप्पू स्वामी, विशाल स्वामी, असिफ चाऊस, अक्षय पाटील, बाबा सुंबेकर, चंद्रकांत बिराजदार, बबन रणशूर, अभिजित स्वामी, रतन जाधव, दयानंद स्वामी, नेताजी भोकरे, बिजू चाऊस, बलभीम स्वामी, किरण पाटील, आकाश विरोधे, प्रदीप घोडके, सुजित पोतदार, बलभीम पाटील, दत्ता स्वामी, गुरुपत स्वामी, बसवंत बंगले, दगडू निर्मळे, आकाश निर्मळे, कपिल स्वामी, राहुल जाधव आदी उपस्थित होते.
रिकाम्या खुर्चिला घातला हार...नगरसेविका मयुरी बिराजदार लोटांगण आंदोलन करीत सकाळी साडे दहा वाजता नगरपंचायत येथे दाखल झाल्या. यावेळी कर्मचारी वगळता एकही अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे आंदोलनकर्त्यानी मुख्यधिकारी व कार्यालयीन अधिक्षक यांच्या रिकाम्या खुर्चिला हार घालून निषेध व्यक्त केला. यापुढे प्रभागात विकास कामे नाही झाले तर यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका मयुरी बिराजदार यांनी दिला आहे.