पावसाच्या खंडात करायच्या उपाययोजना
सध्या सोयाबीन पीक वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या अवस्थेत आहे. ज्या ठिकाणी उशिरा पेरणी झाली आहे त्यांनी कोळपणी,खुरपणी करून घ्यावी.
सोयाबीन कोळपणीच्या पुढे गेले असेल, फुले लागत असतील तर मोठे गवत उपटून तण नियंत्रण करावे.
पावसाच्या खंडात पीक सुकू लागल्यास १३‘००:४५ (पोटॅशियम नायट्रेट) १०० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात फवारणी करावी.
अमावस्याच्या दरम्यान ज्यांना फवारणी शक्य झाली नाही त्यांनी कीड रोग नियंत्रणासाठी पीक परिस्थितीनुसार फवारणी घ्यावी.
पिकाच्या संवेदनशील अवस्थेत पाण्याची गरज व पिकाचे उत्पादन यांचा संबंध असल्याने फुले लागण्याची, शेंगा भरण्याची अवस्था यामध्ये पिकास संरक्षित पाणी देणे गरजेचे आहे. यासाठी तुषार संचच्या (स्प्रिंक्लर) साहाय्याने पाणी द्यावे. अगदीच शक्य नसल्यास शेतात पाणी साठून राहणार नाही अशा प्रकारे हलकेसे मोकळे पाणी द्यावे, असा सल्ला ईटचे मंडळ कृषी अधिकारी निखिल रायकर यांनी दिला आहे.