शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
2
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
3
उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी
4
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
5
मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील
6
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
7
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
8
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
9
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
10
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
11
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
12
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
13
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
14
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
15
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
16
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
17
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
18
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
19
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
20
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष

'अल्पवयीन मुलीसोबत लग्न लावा,अन्यथा पळवून नेतो'; धमकी देणाऱ्या तरुणास पित्याने संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 4:54 PM

विशेष म्हणजे, तरुणाचे लग्न झाले होते, तरीही दुसरे लग्न करण्यासाठी अल्पवयीन मुलीसाठी तो मागणी घालत धमकावत होता

उमरगा (जि. धाराशिव) : तालुक्यातील चिंचोली जहागीर येथे २६ मार्च रोजी झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात उमरगा पोलिसांना अखेर यश आले आहे. या प्रकरणातील आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याची धमकी देत असल्याने तरुणाचा खून केल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती गुरुवारी उमरगा पोलिसांनी दिली.

चिंचोली (जहागीर) येथील शंकर ममाळे (२८) हा चिंचोली रस्त्यालगत असलेल्या आपल्या शेडसमोर शनिवारी रात्री जेवण करून झोपला होता. मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून व हत्याराचा वापर करून खून केला. घटनास्थळी आरोपीने एकही पुरावा ठेवला नव्हता. त्यामुळे पोलिसांपुढे तपासाचे आव्हान होते. दरम्यान, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार तांत्रिक माहितीच्या आधारे ३५ ते ४० संशयितांची उमरगा पोलिसांनी चौकशी केली. यातून मयत शंकर हा दुसरे लग्न करण्यासाठी मुळज येथील आरोपी रमेश शंकर झंपले याच्याकडे त्याच्या मुलीसाठी आग्रह धरत होता. यावरून झंपले याने मारण्याची धमकी दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रमेश झंपले यास पाळत ठेवून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानेच हा खून केल्याचे कबूल केले आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेश राठोड यांनी गुरुवारी दिली आहे.

लग्न झाले असतानाही...मयत तरुण शंकर ममाळे याचे लग्न झाले होते. तरीही दुसरे लग्न करण्यासाठी आरोपीच्या अल्पवयीन मुलीसाठी तो मागणी घालत होता. लग्न लावून न दिल्यास मुलीला पळवून नेण्याची धमकी मयत शंकर देत असल्याचे आरोपी रमेश झंपले याने तपासात पोलिसांना सांगितले.

आठ दिवस ठेवली पाळत...शंकर हा सतत धमकी देत असल्याने त्याचा काटा काढण्याचा निर्धार आरोपी रमेश झंपले याने केला. यासाठी जवळपास आठ दिवस त्याच्यावर पाळत ठेवली. २५ मार्च रोजी रात्री तो शंकरच्या शेडपासून जवळच असलेल्या शेतात लपून बसला. शंकर झोपी गेल्यानंतर हातोडीने डोक्यात वार करून आरोपीने त्याचा खून केला. हे हत्यार ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक मनोज राठोड यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद