शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

तीर्थकुंड हडप प्रकरण : फरार देवानंद रोचकरीला अखेर मुंबईतून उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 2:07 PM

Tirthkund encroachment case Tulajapur : तुळजापूर शहरातील मंकावती तीर्थकुंड हे प्राचीन असून, त्याचा उल्लेख विविध पुराणातही आढळूनही येतो. असे असतानाही तुळजापुरातीलच देवानंद रोचकरी याने या तीर्थकुंडावर मालकी हक्क सांगितला होता.

ठळक मुद्दे शासकीय जागा हडप केल्याबद्दल देवानंद रोचकरी व त्याचा भाऊ बाळासाहेब रोचकरीवर गुन्हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळताच आरोपी रोचकरी तुळजापुरातून पसारराजाश्रयाच्या शोधात त्याने मुंबई गाठली, इथेच पोलिसाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले

उस्मानाबाद/तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापुरातील प्राचीन तीर्थकुंड हडप करुन त्यावर बांधकामाचा घाट घातलेल्या आरोपी देवानंद रोचकरीवर आठवडाभरापूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच पसार झालेल्या रोचकरीच्या मागावर पोलिसांची दोन पथके होती. अखेर बुधवारी दुपारी तो मुंबईतील आमदार निवासाच्या कँटीनजवळ थांबलेला असताना पथकाने त्यास ताब्यात घेतले आहे. ( Fugitive Devanand Rochkari finally picked up from Mumbai by Osamanabad Police) 

तुळजापूर शहरातील मंकावती तीर्थकुंड हे प्राचीन असून, त्याचा उल्लेख विविध पुराणातही आढळूनही येतो. असे असतानाही तुळजापुरातीलच देवानंद रोचकरी याने या तीर्थकुंडावर मालकी हक्क सांगितला होता. तीर्थकुंडास विहीर संबोधून ती आपल्या पूर्वजाची मिळकत असल्याचा दावा करीत त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे कब्जा केला. यासंदर्भात तक्रारी झाल्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चौकशी करुन समितीच्या अहवाला आधारे रोचकरीवर फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते. या कारवाईला रोचकरीने नगरविकास खात्याकडून स्थिगितीही मिळविली होती. मात्र, त्यावर तत्काळ सुनावणी घेऊन स्थगिती आदेश मागे घेत जिल्हाधिाकर्यांचे आदेश नगरविकासने कायम ठेवले. 

हेही वाचा - खळबळजनक ! प्राचीन तिर्थकुंडच हडपला, कब्जेखोरावर गुन्हा दाखल

१० ऑगस्ट रोजी याबाबतचे आदेश निर्गमित होताच इकडे रातोरात प्रशासनाने पोलीस ठाणे गाठून बनावट कागदपत्रे तयार करीत ऐतिहासिक वारसा असणारी शासकीय जागा हडप केल्याबद्दल देवानंद रोचकरी व त्याचा भाऊ बाळासाहेब रोचकरीवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळताच आरोपी रोचकरी तुळजापुरातून पसार झाला. राजाश्रयाच्या शोधात त्याने मुंबई गाठली. इकडे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या सूचनेनुसार निरीक्षक अजिनाथ काशिद यांनी पोलिसांचे दोन पथक तयार करुन त्याच्या मागावर साेडले होते. दरम्यान, बुधवारी रोचकरी हा मुंबईतील आमदार निवासच्या कँटीनजवळ थांबला असल्याची माहिती मिळताच उपनिरीक्षक राहूल रोटे, कर्मचारी अजय सोनवणे, अमोल पवार यांच्या पथकाने कँटीन परिसर गाठून रोचकरीला ताब्यात घेतले. आता पुढील प्रक्रिया पार पाडून गुरुवारी पहाटेपर्यंत त्यास तुळजापुरात आणले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा - 'पावसाळ्यात धाडस, मोहीमही फत्ते'; दुर्गम लिंगाणा सर करून फडकवला तिरंगा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबादPoliceपोलिसUsmanabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबादEnchroachmentअतिक्रमण