कळंब शहरासह ग्रामीण भागात गुरुवारी दुपारपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. यात रात्री नऊच्या सुमारास पावसाचा जोर वाढला, तो पुढे पहाटेपर्यंत टिकला. यामुळेच कळंबपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या भाटशिरपुरा येथील निर्माणाधीन पुलाच्या लगत उभारण्यात आलेल्या पर्यायी रस्ता फुलावरून पुराचे पाणी वाहू लागले. यामुळे कळंब-ढोकी राज्य मार्गावरील वाहतूक मध्यरात्रीनंतर बंद झाली आहे. या पर्यायी पुलाचा काही भाग वाहून गेला असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
चौकट..
बांधकाम विभागाला जाग कधी येणार
कळंब-ढोकी या राज्य मार्गाची बांधकाम विभागाच्या हायब्रिड ॲन्युइटी अंतर्गत सुधारणा करण्यात येत आहे. यातील भाटशिरपुरा येथील काम अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. असे असतानाही संबंधित कंत्राटदार, बांधकाम विभागाच्या मिलीभगतमुळे नागरिकांच्या रेट्याला कोणी दाद देत नाही. याचाच फटका आजच्या पावसात दिसून येत आहे.
सातेफळ, डिकसळ येथे म्हशी ठार
तालुक्यातील सातेफळ व डिकसळ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे दोन म्हशी गुरुवारच्या पावसात वीज पडून ठार झाल्या आहेत.