भूम : ‘सुंदर माझे कार्यालय’ उपक्रमांतर्गत येथील पंचायत समिती व गटशिक्षण कार्यालयाची रंगरंगोटी, सुशोभिकरण करून स्वच्छता व वृक्ष लागवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी नुकतीच उपक्रमाच्या अंमलबजावणीची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ. फड यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. त्यांच्या समवेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नवाळे, भूम तालुका संपर्क अधिकारी डॉ. नामदेव अघाव हेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी कार्यालयीन कर्मचारी व ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेतली. गटविकास अधिकारी बी. आर. ढवळशंख, गटशिक्षणाधिकारी सुनील गायकवाड, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी मेटकर, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी के. डी. मुंढे, विस्तार अधिकारी पी. एस. इंगळे, व्ही. जे वाघमारे आदीसह पंचायत समिती व गटशिक्षण कार्यालयातील कर्मचारी यावेळी हजर होते.
फोटो कॅप्शन :
भूम पंचायत समिती आवारात वृक्षारोपण करतान जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नवाळे, संपर्क अधिकारी डॉ. नामदेव अघाव, गटविकास अधिकारी बी. आर. ढवळशंख आदी.