उस्मानाबाद : महाराष्टÑाची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा मौल्यवान खजिना पुन्हा संशयाच्या फेºयात आला आहे. खजिना हस्तांतरण करताना दिलेल्या चार्ज पट्टीमध्ये दुर्मिळ व ऐतिहासिक ७१ नाण्यांचा उल्लेखच नसल्याने ही नाणी गेली कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अॅड. शिरीष कुलकर्णी व पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात साठा नोंद वही आहे. त्यामध्ये सर्व मौल्यवान वस्तुंची नोंद आहे. साठा नोंद वहीप्रमाणे जाणाºया अधिकाºयाने कायदेशीर बाबींचे पालन करून दुसºया अधिकाºयाकडे चार्ज देणे बंधनकारक आहे. ही सर्व प्रक्रिया करीत असताना सोन्याचे किती वस्तू आहेत? चांदीसह अन्य मौल्यवान वस्तुंची संख्या किती? त्यांचे वर्णन कसे आहे? त्यांचे वजन किती आहे? याची सविस्तर माहिती लिखित स्वरूपात स्पष्ट करणे आवश्यक आहे. पुरातन व मौल्यवान वस्तुंचा चार्ज देताना त्यातील तज्ज्ञांना बोलावणे आवश्यक होते. परंतु, तसे झाले नाही. केवळ एका कागदावर मौल्यावान वस्तुंचे हस्तांतरण केले आहे. त्यामध्ये या नाण्यांचा उल्लेखही नाही. नाण्यांबरोबर खजिन्यातील अन्य मौल्यवान ऐवजाचीही खातरजमा करण्याची आवश्यकता यानिमित्ताने व्यक्त होत आहे.काय आहे खजिन्यात..?श्री तुळजाभवानी मातेच्या खजिन्यात अत्यंत मौल्यवान दागिने आहेत़ अकरा डब्यांमध्ये ते ठेवण्यात आले आहेत़ यातील काही दागिने नित्य वापरासाठी तर काही प्रासंगिक उत्सवाच्या वेळी देवीला परिधान करण्यात येणारे आहेत़ याशिवाय, बिकानेर, औरंगजेब, चित्रकूट, इंदौर स्टेट, लखनौ, बडोदा, पोर्तुगिज यांच्यासह वेगवेगळ्या संस्थान, राजांनी त्या-त्यावेळी भेटवस्तू म्हणून मंदिराला दिलेली सुमारे ७१ नाणीही या खजिन्यात आहेत. नेमकी हीच नाणी आता गायब असल्याचा संशय आहे़
तुळजाभवानीचा खजिना संशयाच्या भोवऱ्यात! ७१ ऐतिहासिक नाणी गायब झाल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 5:32 AM