तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : उत्तर बाजूकडील मंदिराची प्राचीन भिंत पाडणे, तसेच तुळजाभवानी मंदिराच्या अंतराळातील उंबरा काढून पुरातन मंदिराचे नुकसान केल्याप्रकरणी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार सुनील पवार यांच्याविरुद्ध शनिवारी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर शासनाचे राज्यसंरक्षित स्मारक आहे़ मंदिराची दैनंदिन देखभाल तहसीलदार तथा व्यवस्थापक सुनील पवार हे करतात. मंदिराच्या वास्तू रचनेत पुरातत्त्व विभागाच्या परवानगी शिवाय कोणतीही फेरबद्दल करण्याचा अधिकार नसताना त्यांनी २४ नोव्हेंबर २०१७ ते २७ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत तुळजाभवानी मंदिर संस्थान देवीच्या गादी घराच्या उत्तर बाजूकडील प्राचीन भिंत पाडून तेथे भाविकांना बाहेर पडण्यासाठी प्रवेशद्वार केले. तसेच तुळजाभवानी मंदिराच्या अंतराळातील उंबरा काढून पुरातन मंदिराचे नुकसान केल्याची फिर्याद औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागातील नागनाथ सदाशिव गवळी यांनी पोलीस ठाण्यात दिली़
तुळजाभवानी मंदिर व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 3:49 AM