शहरं
Join us  
Trending Stories
1
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
2
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
3
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
4
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
5
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
6
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
7
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
8
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
9
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
10
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
11
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
12
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
13
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
14
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
15
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
16
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
17
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
18
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
19
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
20
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार

तुळजापुरात भीषण अपघात दोघांना ट्रकने चिरडले; ८० फूट फरफटत नेल्याने मृतांचा चेंदामेंदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 7:49 PM

अपघातस्थळावरील युवकांनी ट्रकचा पाठलाग करून चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर-उस्मानाबाद रस्त्यावरील आपसिंगा कॉर्नरजवळ दुचाकीला भरधाव ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर पळून जाण्याच्या बेतातील ट्रकचालकाने वाहन ८० फूट तसेच फरफटत नेल्याने यातील मृतांचा चेंदामेंदा झाला.

तुळजापूर येथील आपसिंगा रोडवरील शिक्षक कॉलनी भागात राहणारे कैलास लक्ष्मण पवार (५०) व दत्तात्रय वसंतराव जगताप (५२, रा. वेताळनगर, तुळजापूर) हे बुधवारी दुपारी दुचाकीवरून शहरात जात होते. आपसिंगा कॉर्नरवरून दुचाकी मुख्य रस्त्यावर येताच पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने (क्र. जीजे ३६ व्ही ४९३३) जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर ट्रकचालक पळून जाण्याच्या उद्देशाने त्याने वाहन तसेच दामटले. त्यामुळे दुचाकीवरील दोघे जवळपास ८० फूट फरफटत गेले. यात त्यांचा चेंदामेंदा झाला.

अपघातस्थळावरील युवकांनी ट्रकचा पाठलाग करून त्यास पुजारी मंगल कार्यालयाजवळ गाठले. चालकास ताब्यात घेऊन त्यांनी त्यास पोलिसांच्या हवाली केले. अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक अजिनाथ काशिद, उपनिरीक्षक बसवेश्वर चनशेट्टी, कर्मचारी विजय राठोड, अजय सोनवणे, अजितकुमार सोनवणे यांनी धाव घेऊन पंचनामा करीत वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी तुळजापूर ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

छिन्नविच्छिन्न अवयव केले गोळा...अपघातस्थळी छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडलेले मृतांचे अवयव अक्षरश: गोळा करून पोत्यात भरावे लागले. पोलीस कर्मचारी विजय राठोड यांच्यासह दुर्गेश साळुंके, आण्णाभाई क्षीरसागर, संतोष साळुंके यांनी मृतदेह व अवयव एकत्र करून एका वाहनाद्वारे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविले.

टॅग्स :Deathमृत्यूOsmanabadउस्मानाबाद