लोहारा (जि.उस्मानाबाद ): नादुरूस्त होऊन रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीला मंगळवारी सांयकाळी साडेसहाच्या सुमारास दुचाकीने जोराची धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक जण गंभीर जखमी झाला होता. मंगळवारी रात्री उस्मानाबाद येथे उपचारादरम्यान जखमी मुलाचा ही मृत्यू झाला आहे. या काका - पुतण्यावर राजोळ जि. गुलबर्गा, कर्नाटक येथे बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ही घटना मंगळवारी सांयकाळी साडे सहाच्या सुमारास लोकमंगल कारखान्याजवळ घडली होती.
याबाबत अधिक माहीती अशी की, सध्या ऊस गाळपाचा हंगाम सुरू आहे. शहरातील लोकमंगल साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक सुरू आहे. परंतु अनेक वाहाने नादुरूस्त होऊन रस्त्यावरच उभी केली जात आहेत. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अर्जून रघू पवार (वय २०) व मेघनाथ पवार (वय १२ हे दोघे रा. राजोळ जि. गुलबर्गा, कर्नाटक) हे दोघे पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीवरून लोकमंगल पेट्रोल पंपावर जात असताना रमणबाग जवळ नादुरूस्त होऊन रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीला त्यांच्या दुचाकीची जोराची धडक बसली. यात अर्जून पवार याचा जागीच मृत्यू झाला. तर मेघनाथ पवार हा गंभीर जखमी झाला. जखमींना युवा सेनेचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक श्याम नारायणकर, परवेज तांबोळी,निळकंठ कांबळे यांनी आपल्या स्वत:च्या वाहानातून लोहारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी अर्जून पवार याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. व मुलगा मेघनाथ यांच्या प्रथमोउचार करुन पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात हालविण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना रात्री दहाच्या दरम्यान मेघनाथ पवार या १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हे दोघे नात्याने काका पुतण्या आहेत.या दोघांची ही प्रेत त्यांच्या गावी राजोळ ( ता.अळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) येथे घेऊन गेले असून बुधवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
पोट भरण्यासाठी आलो आणि मुलगा गमावलोकर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील राजोळ या गावातील पवार कुटूंबीय आपले पोट भरण्यासाठी लोहारा तालुक्यातील खेड पाटी जवळील विट्ट भट्टीवर काम करण्यासाठी आले होते. मंगळवारी विट्ट भट्टीवर काम करुन मोटार सायकलमध्ये पेट्रोल तर टाकून यावे म्हणून विट्ट भट्टीपासुन काही अंतरावरील लोकमंगल पेट्रोल पंपाकडे जात असता काळाने घाला घातला. आम्ही पोट भरण्यासाठी आलो आणि मुलगा गमावलो असे मयत अर्जूनचे वडील रघू पवार सांगत होते.