तालुक्यातील सर्व विभागनिहाय मंडळाधिकारी यांचे संपर्क क्रमांक फलकात समाविष्ट करण्यात आले आहेत. ज्या गावातील रेशन दुकानासंदर्भात तक्रार आहे, त्यांनी थेट संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना संपर्क साधणे, यामुळे सोपे होणार आहे. या व्यतिरिक्त शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे, मृत व्यक्तींचे नाव कमी करणे, आशा योजनेबद्दल माहितीही या फलकात समाविष्ट केलेली आहे. अनावरणप्रसंगी पुरवठा विभागाचे प्रभारी नायब तहसीलदार नितेश काळे, अव्वल कारकून जाधव, तसेच पुरवठा विभागाचे कर्मचारी हजर होते. तालुक्यातील लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नितेश काळे यांनी यावेळी केले.
120721\img-20210712-wa0069.jpg
कळंब तहसील कार्यालयात पुरवठा विभागाच्यावतीने शिधापत्रिकाधारकांसाठी माहिती फलकाचे अनावरण नायब तहसीलदार नितेश काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अव्वल कारकून जाधव तसेच पुरवठा विभागातील कर्मचारी उपस्थित होते