ईट : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल शिनगारे यांच्या हस्ते कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. येथे बुधवारी व शनिवारी ही लस देण्यात येणार आहे.
परिसर उजळला
(फोटो: दत्ता पवार १३)
येडशी : येथील श्री क्षेत्र रामलिंग देवस्थान येथे शनिवारी संध्याकाळी आंध्रप्रदेशातील भाविकांनी नवस पूर्ण करण्यासाठी मंदिराच्या पायऱ्यांवर दिवे लावले होते. त्यामुळे हा परिसर दिव्यांच्या लखलखाटाने उजळून निघाला होता.
धान्य वाटप
नळदुर्ग : जळकोट येथील जिल्हा परिषद शाळेत पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष सतीश पिसे, मुख्याध्यापक जगन्नाथ शिंदे, महादेव पवार, सुरेखा ढोबळे, विठ्ठल गिरी, सचिन सुरवसे आदी उपस्थित होते.
दोघांवर कारवाई
उस्मानाबाद : येडशी येथील शंकर थोडसरे व महेश शिंदे हे अनुक्रमे जुन्या रेल्वे स्थानकाजवळील पत्रा शेडजवळ व येडशी स्थानक परिसरात देशी दारूच्या बाटल्यांसह सापडले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावठी दारू जप्त
कळंब : येथील शुभम बापू पवार हे मार्केट यार्ड परिसरात अठरा लीटर गावठी दारूसह तसेच मोहा येथील विलास मडके यांच्याकडेही गावठी दारू सापडली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.