परंडा - तालुक्यातील ढगपिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेत काेराेना लसीकरणाचा शुभारंभ जिल्हा परिषदेतील कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी गटविकास अधिकारी किशोर अंधारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश भोरे, दत्ता रणभोर, विस्तार अधिकारी कावळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक गरड, सरपंच गुंफा लहु मासाळ, उपसरपंच प्रियंका अशोक गरड, ग्रामसेवक श्रीराम खरात, डाॅ. शीतल पाटील, बप्पाजी काळे, रामराजे काकडे, राजेंद्र परबत, सुरेश येवारे, बप्पाजी जाधव, मुख्याध्यापक यशवंतराव पाटील, नितीन गरड, रामचंद्र वाटाडे, अंगणवाडी कर्मचारी अल्का वासकर, जिजाबाई शिंदे, मनीषा येवारे, रेखा हावळे, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमानंतर गावातच एक हजार वृक्षराेपांच्या लागवडीचा शुभारंभही करण्यात आला. याप्रसंगी सभापती साळुंके यांनी ग्रामस्थांना लसीकरण तसेच वृक्षाराेपणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी जि.प. सभापती दत्ता साळुंके यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.