काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीकरण युद्धपातळीवर व्हावे, यासाठी ग्रामीण भागातही सेंटर देण्यात आली आहेत. त्यानुसार येणेगूर अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत भुयार चिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये लसीकरणासाठी काटेवाडी, बेरडवाडी, येळी, नाईकनगर, सुंदरवाडी, भुसणी, मुरुम व गावातील नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. दिवसभरात काेविशिल्डचा पहिला व दुसरा डाेस १६५जणांना देण्यात आला. याकामी कोरोना दक्षता समितीचे सदस्य अशोक पवार, सरपंच रणजित गायकवाड, मंडल अधिकारी एम.ए.दुरुगकर, ग्रामसेवक बी.व्ही.हंगरगेकर, तंत्रज्ञ बालाजी जोमदे, तलाठी एम.अंबर, पोलिस पाटील पद्माकर पाटील, विकास कांबळे, जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक व्ही.एच. पाटील, सहशिक्षक एम.बी.कांबळे, एस.के.सुरवसे, छायाबाई शिंदे आदींनी पुढाकार घेतला. लसीकरण केंद्रास उमरग्याचे उपविभागीय महसूल अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, येणेगूरचे वैद्यकीय अधिकारी सुहास साळूंके आदींनी भेट देऊन, पाहणी करून सूचना केल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, भुयार चिंचोलीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.एल.ई.घोडके, डॉ.एच.बी.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली परिचारिका शुभांगी टिकांबरे, झेड.वाय.सय्यद, तंत्रज्ञ सुजित जगताप, अंगणवाडी परिवेक्षिका जे.एल.दूधभाते, आशाताई कार्यकर्त्या लक्ष्मीबाई पांचाळ, सुरेखा दासमे, व्ही. टी. हाके आदींनी लसीकरण मोहिमेत चांगला सहयोग दिल्याबद्ल गावकऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
भुयार चिंचोलीतील केंद्रावर १६५ ग्रामस्थांना दिली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:32 AM