याप्रसंगी लोहारा पंचायत समिती सभापती हेमलता रानखांब यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर येथील शास्त्रज्ञ डॉ. श्रीकृष्ण झगडे यांनी रानभाज्यांची ओळख, आहारातील रानभाज्यांचे महत्त्व, सोयाबीनवरील कीड रोगाविषयी मार्गदर्शन केले तर तालुका कृषी अधिकारी मलिंद बिडबाग यांनी रानभाजी महोत्सव कल्पना व रानभाजीचे आहारातील महत्त्व, याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतिशील शेतकरी श्यामसुंदर पाटील, हेमंत माळवदकर, पवन रसाळ, कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शैलेश जट्टे यांनी, तर आभार दीपक जाधव यांनी मानले. कार्यक्रमासाठी कैलास पवार, किरण निंबाळकर आदींनी परिश्रम घेतले.
लाेहारा येथे पार पडला रानभाज्या महाेत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:37 AM