तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तालुक्याच्या प्रशासकीय यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती काेराेनाबाधित निघाल्यास कुटुंबातील सर्व व्यक्तींना क्वॉरंटाइन करावे लागते. गावपातळीवर सुविधा नसल्याने एकाद्या माेठ्या गावातील वा तालु्क्याच्या ठिकाणी असलेल्या सेंटरमध्ये न्यावे लागते. दम्यान, अशा प्रकारचे सेंटर आता गावपातळीवरही उभे करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण काेराेनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने भर पडत आहे. दरम्यान, काेराेनामुळे आर्थिक अडचणीचा डाेंगर उभा राहिला आहे. अशा काळात बचत गटांना कर्जाचे हप्ते भरणे कठीण हाेत आहे. एवढेच नाही तर धाेका पत्करून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. अशावेळी अनेकांना काेराेनाची लागण हाेत आहे. परिणामी ते वेळेवर हप्ता भरू शकत नाही. परिणामी त्यांना दंड लागताे. हे टाळण्यासाठी क्वाॅरंटाइन कालावधी संपेपर्यंत हप्ता भरण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. ग्रुपच्या वतीने रवींद्र लाेमटे यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले.
गाव तेथे क्वाॅरंटाइन सेंटर उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:34 AM