उमरगा : गावातील रस्त्यांसह अन्य सुविधांसाठी ग्रामपंचायतींकडे पुरेसा निधी नसताे. हीच बाब लक्षात घेऊन लाेहारा-उमरगा मतदारसंघाचे आ. ज्ञानराज चाैगुले यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला हाेता. त्यानुसार दाेन्ही तालुक्यांतील ३१ गावांसाठी साडेचार काेटींचा निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून रस्ते, हायमास्ट दिवे बसविण्यात येणार आहेत. परिणामी, संबंधित रस्ते चकाकणार असून गावेही उजळणार आहेत.
उमरगा, लाेहारा तालुक्यांतील अनेक गावांना पक्के रस्ते नाहीत. हायमास्ट दिव्यांचा विषय तर खूप दूरचा. रस्त्यांसह अन्य सुविधा निर्माण करायच्या म्हटले तर ग्रामपंचायतींकडे पुरेसा निधी नसताे. त्यामुळे ग्रामस्थांना वर्षानुवर्षे विशेषकरून रस्त्याच्या प्रश्नाला ताेंड द्यावे लागत आहे. ही बाब समाेर आल्यानंतर आ. ज्ञानराज चाैगुले यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यानुसार २०२०-२१ या आर्थिक वर्षात मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेंतर्गत उमरगा व लोहारा तालुक्यांतील ३१ गावांसाठी ४ कोटी ५० लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून उमरगा तालुक्यातील जकेकूर येथे सिमेंट रस्त्यासाठी १५ लाख व हायमास्टसाठी ५ लाख, मुळज येथे सिमेंट रस्ता १५ लाख व हायमास्ट ५ लाख, जकेकूरवाडी येथे सिमेंट रस्ता १० लक्ष व हायमास्ट ५ लक्ष, मातोळा येथे सिमेंट रस्ता १० लक्ष व हायमास्ट ५ लक्ष, एकोंडी ज. येथे सिमेंट रस्ता १० लक्ष व हायमास्ट ५ लक्ष, चिंचकोट येथे सिमेंट रस्ता १० लक्ष व हायमास्ट ५ लक्ष, कोळसूर गुं. सिमेंट रस्ता १० लक्ष व हायमास्ट ५ लक्ष, पळसगाव सिमेंट रस्ता १० लक्ष व हायमास्ट ५ लक्ष, भिकार सांगवी सिमेंट रस्ता १० लक्ष व हायमास्ट ५ लक्ष, बाभळसूर सिमेंट रस्ता १० लक्ष व हायमास्ट ५ लक्ष, आलूर सिमेंट रस्ता १५ लक्ष, कवठा सिमेंट रस्ता १५ लक्ष, नाईचाकूर सिमेंट रस्ता १५ लक्ष, बलसूर सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष, बेळंब सिमेंट रस्ता १० लक्ष, गुगळगाव सिमेंट रस्ता १० लक्ष मळगी सिमेंट रस्ता १० लक्ष, कोराळ सिमेंट रस्ता १०, कसगी सिमेंट रस्ता १० लक्ष, गुगळगाव सिमेंट रस्ता ५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
चाैकट...
दृष्टिक्षेपात लाेहारा तालुका
लोहारा तालुक्यातील आरणी येथे सिमेंट रस्ता १० लक्ष व हायमास्टसाठी ६ लक्ष, मार्डी सिमेंट रस्ता १० लक्ष व हायमास्टसाठी ५ लक्ष, धानुरी सिमेंट रस्ता १५ लक्ष व हायमास्टसाठी ५ लक्ष, राजेगाव सिमेंट रस्ता १० लक्ष व हायमास्टसाठी ५ लक्ष, तावशीगड सिमेंट रस्ता १५ लक्ष व हायमास्टसाठी ५ लक्ष, भातागळी सिमेंट रस्ता १५ लक्ष, जेवळी सिमेंट रस्ता १५ लक्ष, अचलेर सिमेंट रस्ता १५ लक्ष, रेबे चिंचोली सिमेंट रस्ता १५ लक्ष, उदतपूर सिमेंट रस्ता १० लक्ष, आष्टा (का.) गावातील सिमेंट रस्त्यासाठी १५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.