उस्मानाबाद : जुन्या वादातून दाेन गटांत तुंबळ हाणामारी झाली. ही घटना लाेहारा तालुक्यातील मुर्शदपूर येथे रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी परस्परविराेधी तक्रारीवरून लाेहारा पाेलीस ठाण्यात दाेन स्वतंत्र गुन्हे नाेंदविण्यात आले आहेत.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मुर्शदपूर येथील सुषमा रंगराव कांबळे कुटुंबीय व गावातीलच करुणा बालाजी खराेसे यांच्या कुटुंबीयांसाेबत जुन्या वादातून संघर्ष पेटला. या दाेन्ही गटांनी परस्परविराेधी शिवीगाळ तसेच लाथाबुक्क्यानी व काठीने बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर ठार मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी सुषमा कांबळे व करुणा खराेसे यांनी दिलेल्या परस्परविराेधी प्रथम खबरेवरून लाेहारा पाेलीस ठाण्यात भादंसंचे कलम १४३, १४७, १४९, ३२५, ३२४, ४५२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.