शेती सिंचनाखाली येऊन आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन याेजना सुरू केली. या याेजनेच्या माध्यमातून खाेदलेल्या विहिरीचे पेमेंट आठवडाभरात देण्यात यावे, असे शासनाचे निर्देश आहेत. दरम्यान, या याेजनेतून पेठसांगवी येथील शेतकरी श्याम गोरोबा कांबळे यांनी विहिरीसाठी प्रस्ताव दाखल केला. पाठपुराव्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी मिळली. यानंतर कार्यारंभ आदेश मिळाला. शेतीसाठी पाण्याची गरज असल्याने शेतकरी कांबळे यांनी युद्धपातळीवर विहिरीचे काम पूर्ण झाले. यासाठी सुमारे हातउसणे पैसे घेतले. परंतु, विहिरीचे काम पूर्ण हाेऊन एक महिन्याचा कालावधी लाेटला. मात्र, अद्याप छदामही मिळालेला नाही. त्यामुळे संबंधित शेतकरी अडचणीत आला आहे. दरम्यान, याबाबत उमरगा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी माशाळकर यांच्याशी संपर्क केला असता, जिल्हास्तरावर एकत्रित प्रक्रिया हाेत आहे. त्यामुळे बिल निघण्यास विलंब हाेताे. जिल्हास्तरावरून प्रक्रिया पूर्ण हाेताच रक्कम खात्यावर जमा केली जाईल, असे ते म्हणाले.
विहीर खाेदली, अनुदानाचा पत्ता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:22 AM